रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित साधून शिक्षकवर्ग विरुद्ध इ . १० वी चे विद्यार्थी यांच्या मध्ये क्रिकेट सामना आयोजित करण्यात आली. आठ षटकांचा सामना आयोजित करण्यात आला. यामध्ये शिक्षक संघाने नाणे फेक जिंकून ५४/४ इतकी धावसंख्या उभारली.हे आव्हान विद्यार्थी संघाकडून पेलले गेले नाही.
शिक्षक संघाने १६ धावांनी हा सामना जिंकला. उत्कृष्ट फलदांज व उत्कृष्ट गोलंदाज होण्याचा बहुमान अनुक्रमे श्री.मंदार हाळवणकर व श्री.संतोष कदम यांनी मिळविला, तर या सामन्याचे सामनावीर श्री.विजय केसरकर ठरले.