मिलाग्रिस हायस्कूल, सावंतवाडी येथे बालदिन मोठ्या उत्साहात साजरा

दिनांक 15  नोव्हेंबर 2021:  सोमवार रोजी मिलाग्रिस प्रशालेत, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित  जवाहरलाल नेहरू यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस *बालदिन* म्हणून साजरा केला जातो.मिलाग्रिस प्रशालेचे प्रिन्सिपल माननीय रेव्ह. फादर रिचर्ड सालढाणा यांच्या शुभहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.  इंग्लिश प्रायमरी शिक्षकांच्या नृत्याविष्काराने, तसेच हायस्कूल शिक्षकांच्या हृदयस्पर्शी गीताने आणि  शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या बोधपर निखळ विनोदी नाटकाने विद्यार्थ्यांनी बालदिनाचा मनसोक्त आनंद लुटला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टीचर सौ दीप वारंग यांनी केले. बालदिनाचे महत्व टीचर सौ नेविस सालढाणा यांनी सांगितले तर आभार प्रदर्शन कु.युग म्हापसेकर याने केले. फनी गेम्स व नंतर सर्व मुलांना खाद्यपदार्थांचे वाटप करून या कार्यक्रमाची सांगता झाली.