रोझरी इंग्लिश स्कूल येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रोझरी इंग्लिश स्कूल आजरा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. शाळेतील अनेक फलक प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगणारे अशाने सजवले गेले. विविद देश भक्तीपर गीतांनी हा उत्सव अधिक रंगदार झाला. तर मुख्यप्रवेशद्वारावर राष्ट्रध्वजाची सुरेख रांगोळी रेखाटली गेली.

आजच्या दिवशी ध्वजारोहण मा.फा.ऑल्विन गोन्साल्वीस यांच्या शुभहस्ते झाले.या वेळी शाळेचे प्राचार्य फा.फेलिक्स लोबो व व्यवस्थापक फा.मिनिन वाडकर उपस्थित होते. राष्ट्रगीत शाळेच्या बँड विद्यार्थ्यांनी तालबद्ध रितीने गायिले.

या कार्यक्रमास शिक्षक-पालक संघाचे सर्व सदस्य, सिस्टर्स ,ब्रदर,अनेक माजी विद्यार्थी, पालक वर्ग व शिक्षकवृंद झेंडा वंदनास उपस्थित होते.

कार्यक्रम एम.सी.सी विद्यार्थ्यांनी मानवंदन देवून संपन्न झाला.विद्यार्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेवून आनंद लुटला.